जिल्ह्यातील २० देवस्थानांना मिळणार 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

Foto
सागर प्रकाशनचे
साजवार्ता
Page No.: 8 Date: 23/11/2026
विकासकामांना येणार वेग
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्ह्यातील २० देवस्थानांना 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले असून, निकष पूर्ण करणाऱ्या देवस्थानांना तातडीने दर्जा देण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील या देवस्थानांच्या मूलभूत सुविधांसह सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी (दि. २०) जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. 'क' दर्जा मिळाल्यास देवस्थानांच्या उपलब्ध मदत होईल. तसेच भाविकांना आवश्यक
क वर्ग प्रस्तावात या देवस्थानांचा समावेश
'क' वर्ग देण्याच्या प्रस्तावामध्ये वैजापूर महालगाव येथील संघरत्ना बुद्धविहार, जाड तालुक्यातील मानव दक्षिणमुखी मारुती मंदिर, फैजपूर लव्हाडी येथील श्रीकृष्ण आश्रम, त्रिवेणी संगम बेट सासेगाव येथील संत सर्जदास महाराज आश्रम, धारावीखेड येथील श्रीक्षेत्र शिवनंदन कानिफनाथ पावनभूमी, भांबरवाडी येथील हरिहर चैतन्यधाम आश्रम, हिरापुरी महाराज संस्थान, मकरंदपूर येथील लिंगेश्वर महादेव मंदिर, दाभाडी येथील भाट्या मारोती मंदिर आदी देवस्थानांचा समावेश आहे.
सुविधा पुरविता येतील, असे सदस्यांनी सांगितले. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील २० देवस्थानांचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाल्याची माहिती दिली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions